[ahmednagar] - निवडणुकीचे रिंगण आज होणार स्पष्ट

  |   Ahmednagarnews

माघारीची उत्सुकता; ४९० जण अजून रिंगणात

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर महापालिका निवडणूक रिंगणातून विद्यमान नगरसेविका सुनीता मुदगल यांच्यासह पाच जणांनी माघार घेतली असली तरी माघारीचा मुख्य महोत्सव सोमवारी (२६ नोव्हेंबर) अखेरच्या दिवशी रंगणार आहे. महापालिकेच्या निवडणूक रिंगणात आता ४९० जण राहिले आहेत. त्यामुळे यापैकी किती जण माघार घेतात, यावर निवडणुकीतील सर्वच प्रभागांच्या अंतिम रिंगणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या ६८ नगरसेवकांच्या निवडीसाठीची निवडणूक ९ डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी शहरात १७ प्रभाग करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत तब्बल ७१५ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. अनेकांनी सावधगिरी म्हणून दोन-तीन अर्ज भरून ठेवले होते. असे एकाचेच अनेक असलेले अर्ज छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निकाली काढले गेले तसेच पक्षाचा 'एबी' फॉर्म नसलेल्यांचे वैध अर्ज अपक्ष म्हणून नोंदवले गेले. प्रत्येक उमेदवाराचा एकच वैध अर्ज ठेवला गेल्याने रिंगणात ४९५ अर्ज राहिले होते. यापैकी शनिवारी माघारीच्या पहिल्या दिवशी ५जणांनी अर्ज काढून घेतले. त्यामुळे आता रिंगणात ४९० अर्ज राहिले आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eJ6WwgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬