[ahmednagar] - हस्तलिखित स्टेशन डायरी होणार बंद

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

पोलिस ठाण्याचा आरसा आणि प्रमुख दस्तऐवज म्हणून ओळख असलेली हस्तलिखित स्टेशन डायरी आता बंद होणार आहे. त्याऐवजी सर्व नोंदी संगणकीकृत करण्यात येणार असून दर २४ तासांनी त्याची प्रिंट काढून फाइल करण्यात येणार आहे. पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना हे आदेश दिले आहेत.

पोलिस स्टेशनचा कारभार आता संगणकीकृत झाला आहे. एफआयआर नोंदविण्याचे कामही संगणकीकृत झाले असून इतर दस्तऐवजही संगणकावर तयार केले जात आहेत. पोलिस दलाला संगणकीकृत करणारा 'सीसीटीएनएस' हा प्रकल्प सप्टेंबर २०१५ पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्यानंतर आता सर्वत्र त्याचा बऱ्यापैकी वापर सुरू झाला आहे. त्यामुळे हस्तलिखित पद्धतीने होणारी सर्व कामे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली; मात्र, अद्याप काही ठिकाणी स्टेशन डायरी जुन्याच पद्धतीने हाताने लिहिली जात होती. या नोंदीही संगणकावर घेणे आवश्यक असल्याने आधी हस्तलिखित डायरी तयार करायची आणि मग त्या नोंदी संगणकावर घ्यायच्या अशी पद्धत काही पोलिस ठाण्यांत अवलंबण्यात येत आहे. त्यासंबंधी पोलिस महासंचालकांनी नुकताच हा आदेश काढला आहे. त्यांनी म्हटले आहे, 'अशा पद्धतीने एकच काम दोनवेळी करावे लागत आहे. त्यामुळे स्टेशन डायरी हाताने लिहिणे त्वरित बंद करावे. त्याऐवजी सीसीटीएनएस प्रणालीतच सर्व नोंदी कराव्यात. प्रत्येक २४ तासाला म्हणजे १२ वाजता स्टेशन डायरीची प्रिंट काढून पोलिस ठाण्याच्या फाइलमध्ये ठेवावी,' असा आदेश देण्यात आला आहे....

फोटो - http://v.duta.us/p-FnHQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Edz-DAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬