[aurangabad-maharashtra] - पत्रकार संघटनेतर्फे आज धरणे आंदोलन

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद : जिल्हा मराठी पत्रकार संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी (२६ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाकडून देण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकार पेंन्शन सुरू करावे, छोट्या वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घ्यावे, ग्रामीण भागातील पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती द्यावी आदी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. पत्रकारांच्या हितासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी आंदोलनात २६ नोव्हेंबर सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर येथे सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव संजय वरकड, विभागीय सचिव प्रमोद माने, मुंबई प्रतिनिधी सुनीलचंद्र वाघमारे, कानिफ अन्नपूर्णे यांनी केले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wWz6SgAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬