[aurangabad-maharashtra] - मुस्लिम मराठी साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी डॉ. पी. ए. इनामदार

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद : मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे १२ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहत्यि संमेलन येत्या ४ ते ६ जानेवारी असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ .पी. ए. इमानमदार यांची निवड करण्यात आली आहे.

आझम कॅम्पस पुणे येथे मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विलास सोनवणे यांनी डॉ. पी. ए. इनामदार यांच्या नावाचा प्रस्ताव स्वागताध्यक्षपदासाठी मांडला, ए. के. शेख आणि बशीर मुजावर तसेच डॉ. बशारत अहमद यांनी अनुमोदन दिले आणि एकमताने डॉ. पी. ए. इनामदार यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली. तीन दिवसीय साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलन, नवोदितांचे कवी संमेलन, एकांकिका तसेच मुलाजुला मुशायरा असे भरगच्च आयोजन असणार आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KqTLDgAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬