[aurangabad-maharashtra] - सहकारवृत्ती जोपासणे गरजेचे

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दिवंगत नेते बाळासाहेब पवार यांचे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य होते. सद्यस्थितीत त्यांनी रुजवलेली सहकारवृत्ती जोपासणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल,' असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्रात रविवारी बाळासाहेब पवार यांच्या १९व्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, डॉ. मदन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार यांच्या कार्यावर शितोळे यांनी प्रकाश टाकला. 'सत्तेपेक्षा प्रदेशाच्या विकासाला बाळासाहेबांनी महत्त्व दिले. त्यांचे दिशादर्शक काम अजूनही प्रेरक आहे,' असे शितोळे म्हणाले.

'बाळासाहेबांनी राज्यभर योगदान दिले. वेगवेगळ्या सहकार संस्था स्थापन करून स्वत:च्या कुटुंबाकडे न ठेवता जनतेला सुपूर्द केल्या. समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी परिश्रम घेतले' असे डॉ. चव्हाण म्हणाले. अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उमेश नवल यांनी सूत्रसंचालन केले आणि रवी दाभाडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Dj0g_QAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬