[kolhapur] - अनुदान थकले, योजनेला मुदतवाढ

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे राज्य सरकारने दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान दूध अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध दूध संघांची सुमारे दहा कोटी रुपयांहून अधिक रक्कम सरकारकडे थकीत आहे. दुसरीकडे नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत दुधाच्या उत्पादनात वाढ होते. दूध उत्पादन वाढले तरी खरेदी-विक्री दरात कसलीही वाढ संभवत नाही असे संघांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात गोकुळ, वारणा, शाहू, स्वाभिमानी, हनुमान यळगूड, अन्नपूर्णा अशा सहकारी आणि खासगी तत्वावरील ११ दूध संघाकडे रोज जवळपास २० लाख लिटर संकलन होते. संकलित दुधात साधारणपणे ५० टक्के दूध गायीचे आहे. सरकारने सहकारी व खासगी संस्थांना गायीच्या दुधाला २५ रुपये दर देण्याचा आदेश दिला. तसेच दूध भुकटी व दूध निर्यातीसाठी खासगी आणि सहकारी संघांना भुकटीसाठी प्रति किलो ५० रुपये तर निर्यात होणाऱ्या दुधासाठी पाच रुपये अनुदान योजना जाहीर केली. दरम्यान दूध अनुदान योजनेंतर्गत वारणा दूध संघाला ऑगस्ट महिन्याचे सुमारे दोन कोटी दहा लाख रुपयांचे अनुदान मिळाले. तर गोकुळ दूध संघाचे सहा कोटी ७९ लाख रुपयांचे अनुदान सरकारकडे थकीत आहे. राज्यातील विविध संघांचे एकूण ८० कोटी रुपये अनुदान थकीत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/HN6YLAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬