[kolhapur] - मुळीक, सावंत, देसाई पोलिसांच्या ताब्यात

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गाडी मोर्चाने मुंबईत जाण्याची तयारी करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी रविवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास ताब्यात घेतले. वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे आणि प्रताप नाईक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी दसरा चौकात एकत्र येत पोलिसांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. दरम्यान, सोमवारी सकाळी दसरा चौकातून गाडी मोर्चाला सुरुवात होणार आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी राज्यातील कार्यकर्त्यांनी सोमवारी गाडी मोर्चाने मुंबईत जाण्याचे नियोजन केले असून, रविवारी मोर्चाची पूर्वतयारी सुरू होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला सोमवारी दहा वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त असल्याने आंदोलकांनी मोर्चा काढू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. यानंतरही आंदोलनावर ठाम राहिल्याने रविवारी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी समाजाच्या प्रमुख पाच कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले. वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे आणि प्रताप नाईक यांना अधीक्षक देशमुख यांनी मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, मोर्चा स्थगित करण्यास नकार दिल्याने अधीक्षकांनी या पाच जणांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले....

फोटो - http://v.duta.us/W_5SlgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/AAZfhAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬