[mumbai] - पुढाऱ्यांच्या शिफारशीने बदल्या कशा?

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर आता कायद्याचे नियमन असताना राजकीय पुढाऱ्यांच्या शिफारशींची दखल का घेतली जाते आणि त्याप्रमाणे बदल्या का केल्या जातात, असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. तसेच यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्रावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही दिले आहेत.

बाळासाहेब तिडके यांच्या बदलीच्या निमित्ताने हा गंभीर प्रश्न उच्च न्यायालयासमोर आला आहे. 'तिडके यांची बदली पूर्वी बुलढाणा उपविभागीय अधिकारी पदावरून माणगाव (रायगड) उपविभागीय अधिकारी पदावर झाली होती. मात्र, नंतर फेब्रुवारी-२०१८मध्ये त्यांची बदली ठाणे उपजिल्हाधिकारीपदी करण्यात आली. ही बदली तिडके यांच्या विनंतीवरून आमदार मनीषा चौधरी व मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या शिफारस पत्रांप्रमाणे करण्यात आल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले. मात्र, आपण आमदार किंवा मंत्र्यांना कधीच भेटलो नाही आणि बदलीसाठी विनंतीही केली नाही. बदलीची शिफारसपत्रे ही ज्याची आता माणगाव उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे, त्याच्या सांगण्यावरून धाडण्यात आली', असा आरोप करत तिडके यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) धाव घेतली. मात्र, लवादाने त्यांचा अर्ज १ ऑगस्ट रोजी फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली आहे....

फोटो - http://v.duta.us/nZyB9AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7dWCxQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬