[mumbai] - मल्ल्याला दिलासा नाही

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अनेक बँकांची नऊ हजार कोटी रुपयांहून अधिकची कर्जे बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. 'मला परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करून माझी मालमत्ता जप्त करू देण्याची विनंती करणारा अर्ज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पीएमएलए न्यायालयात केला आहे. त्याला आज, २६ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती द्यावी', अशी विनंती मल्ल्याने अर्जाद्वारे केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

'बँकांच्या समुहाने आपले पैसे वसूल करण्यासाठी केलेल्या अर्जांवर अपिल लवादासमोर २६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत ईडीने केलेल्या अर्जावरील सुनावणी स्थगित करावी', असा विनंतीअर्ज मल्ल्याने पीएमएलए न्यायालयापुढे यापूर्वी केला होता. मात्र, पीएमएलए न्यायालयाने तो ३० ऑक्टोबरला फेटाळला होता. त्यामुळे त्याविरोधात मल्ल्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन पीएमएलए न्यायालयातील त्या अर्जावरील सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती केली होती. याविषयी गुरुवारी न्या. राजेंद्र सावंत व न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली....

फोटो - http://v.duta.us/V_M7qgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/itxlzAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬