[mumbai] - शरयूमध्ये सापडल्या राजीनाम्याच्या कागदी होड्या

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर काही कागदी होड्या सापडल्या आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी शनिवारी आरती झाल्यानंतर आपल्या खिशातील राजीनाम्याच्या कागदी होड्या करून शरयूमध्ये प्रवाहित केल्या होत्या आणि त्याच होड्या रविवारी सकाळी तेथील नागरिकांना सापडल्याची आपली माहिती आहे, अशी उपरोधिक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दादरच्या सभेत भाजपला उद्देशून म्हणाले होते की, निर्लज्जांनो, राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू? त्यामुळे अयोध्येला गेल्यानंतर ते राम मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ केल्याशिवाय मुंबईला परत येणार नाहीत, असाच अनेकांचा समज झाला होता. पण ते तर केवळ सहकुटुंब-सहपरिवार तीर्थयात्रेला गेल्याचे दिसून आले आहे, असे विखे पाटील म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/gl9d2gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/I4KOjgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬