[mumbai] - सार्वजनिक सुरक्षा अधिनियम कायदा लागू व्हावा

  |   Mumbainews

...

मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला आज, २६ नोव्हेंबर रोजी १० वर्षे पूर्ण होत आहे. या दहा वर्षांत सुरक्षा यंत्रणांनी दशहतवादाशी दोन हात करण्यासाठी स्वत:च्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे. नवीन गाड्या, शस्त्रास्त्र खरेदी करण्यापासून ते नवीन सुरक्षा यंत्रणांची निर्मिती करण्यापर्यंत वेगवेगळी पाऊले उचलण्यात आली आहेत. आजच्या घडीला आपली सुरक्षा यंत्रणा कितपत सक्षम आहे, कार्यपद्धतीत आणखी काय बदल अपेक्षित आहे, याबाबत राज्याचे माजी पोलिस महासंचालक डॉ. प्रवीण दीक्षित यांची विशेष मुलाखत.

१. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होत आहेत. या दहा वर्षांत आपल्या सुरक्षा यंत्रणांनी सक्षम होण्यासाठी भरपूर बदल केले आहेत. याचा कितपत फायदा होतो आहे?

उत्तर - दहशतवाद हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्थितीवर अवलंबून असतो. त्याला स्थानिक पातळीवर कसे खतपाणी मिळते यावर तो फोफावत जातो. एखादी दहशतवादी संघटना आपला दबदबा निर्माण करण्यासाठी एखादी मोठी कारवाई करत असते. मुंबईवरील हल्ल्यानंतर संपूर्ण देश खडबडून जागा झाला. यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी नवीन शस्त्रास्त्रे आणली गेली. सागरी पोलिस दल तयार करण्यात आले. पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा बलाच्या तुकड्या आता राज्यात कार्यरत झाल्या आहेत. तसेच आपल्या राज्यात फोर्स १ सारखी नवी सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. यामुळे आपली यंत्रणा सक्षम झाली आहे, असा विश्वास वाटतो....

फोटो - http://v.duta.us/i8JFmwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_ZwBGwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬