[nagpur] - आता प्लास्टिकच्याही सळाखी

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

लोखंडांपेक्षाही मजबूत आणि पाचपट हलकी सळाख आणि तीही प्लास्टिकची…. आश्चर्य वाटले ना…? हो, हे शक्य असल्याचा दावा इंडियन रोड काँग्रेसमध्ये सहभागी झालेल्या संशोधकांनी केला. यासह रस्त्यांवर खड्डे पडणार नाही यासाठी ठिसूळ मातीला दगडासारखे मजबूत करणारे रशियन तंत्रज्ञान आता देशात वापरले जात आहे. यासह रस्ते, पूलनिर्मितीतील एकाहून एक भन्नाट संशोधन 'आयआरसी'मध्ये मांडण्यात आले.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांवर मंथन घडवून आणण्यात आले. नागपुरात चौथ्यांदा घेण्यात आलेल्या या अधिवेशनात देश-विदेशातील तज्ज्ञांनी नवनव्या कल्पना मांडल्या. हे नवे तंत्रज्ञान प्रत्यक्षस्वरूपात अवलंबून नवनिर्मितीकडे वाटचाल करावी हा उद्देश असल्याचे आयआरसीच्या आयोजकांनी सांगितले. आयआरसी जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या विविध शोधपत्रांचे सादरीकरण अधिवेशनात करण्यात आले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/F9iunQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬