[nagpur] - मारेगाव पोलिसांवर आरोपीचा हल्ला

  |   Nagpurnews

यवतमाळः

मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता, आरोपीने अचानक पोलिसांवर हल्ला चढवला. यात एक पोलीस ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.

जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यापासून १० कि. मी. अंतरावर असलेल्या हिवरी येथे घडलेली ही घटना अंगाचा थरकाप उडवणारी आहे. मारेगावचे पोलीस निरीक्षक वडगावकर यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार मधुकर निळकंठ मुके (वय ५२), हवालदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे (वय ४८), पोलीस शिपाई प्रमोद फुफरे (वय ३१), पो.चालक राहुल बोन्डे (वय ३२), पोलीस नाईक निलेश वाढई (वय ३५) हे सर्व पोलीस अजामीनपात्र वॉरंट घेऊन आरोपी अनिल लेतू मेश्राम (वय ३५) याला ताब्यात घेण्याकरीता त्याच्या घरी गेले. आपल्याला पकडायला पोलीस आल्याचे समजताच आरोपी आणि त्याची आई इंदिरा मेश्राम यांनी लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने पोलीस गोंधळले. यात जमादार राजेंद्र कुळमेथे यांना गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले. पोलिसांनी हल्ला रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोपीच्या आक्रमकतेपुढे पोलीस हतबल झाले....

फोटो - http://v.duta.us/wYTEMwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qJA2jwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬