[nashik] - इंजिनीअरिंगसाठी 'गेट' परीक्षा अनिवार्य नाही

  |   Nashiknews

नाशिक:

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली गेट परीक्षा अनिवार्य असल्याचा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये होता. मात्र, अखिल भारतीय तंत्रिकी शिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईद्वारे परीक्षा अनिवार्य नसल्याचे परिपत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला असून त्यांना दिलासा मिळाला आहे.

इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम पूर्ण करताना एक्झिट परीक्षा म्हणून गेट बंधनकारक करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना गेट द्यावी लागणार अशी चर्चा गेल्या आठवड्यात सुरू होती. परंतु ही परीक्षा अनिवार्य नसल्याचे परिपत्रक तंत्रिकी शिक्षण परिषदेने नुकतेच जाहीर केले आहे. गेट परीक्षा एक्झिट नावाने घेतल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेत किमान गुण मिळवून उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला संबंधित विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळणार नव्हते. परंतु परिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसते आहे....

फोटो - http://v.duta.us/VUdoZQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Fk5gkgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬