[nashik] - संत तुकारामांची नीती यशवंतरावांनी स्वीकारली

  |   Nashiknews

अभ्यासक अॅड. मयूर जाधव यांचे मत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

क्षमाशील वृत्ती, नम्रता, प्रामाणिकपणा हे गुण यशवंतरावांमध्ये होते. त्यांनी समोरच्या माणसाला कधीही निराश केले नाही, कुणी संधान करीत असेल तर त्याला माफ केले. यशवंतरावांनी संत तुकारामांची नीती आपलीशी केली होती, असे मत यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्राचे अभ्यासक अॅड. मयूर जाधव यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्रमंडळातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्ताने मु. शं. औरंगाबादकर सभागृहात यशवंतनीती या विषयावर व्याख्यान झाले. 'सावाना'चे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते मंचावर उपस्थित होते. यावेळी अॅड. जाधव यांनी संत तुकारामांच्या अभंगांचे दाखले देत, अनेक किस्से-आठवणी सांगत यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व उभे केले. चव्हाण हे व्यक्ती म्हणून अत्यंत साधे, संयमी होते. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नीकडे साधा ट्रान्झिस्टर विकत घेण्यासाठी शंभर रुपयेही नव्हते. ते त्यांना दुसऱ्याकडून उसने घ्यावे लागले होते. चव्हाण यांनी पदाचा मोठेपणा कधीच मिरवला नाही. त्यांच्या आईच्या मैत्रिणीने आणून दिलेल्या ज्वारीच्या भाकरी ते चवीने खात आणि त्या माऊलीचा चरणस्पर्श करीत. आचार्य अत्र्यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका करूनही चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले नाही. उलट त्यांना क्षमा केले. परिणामी, आचार्य अत्र्यांनी त्यांचे 'मोरूची मावशी' हे नाटक चव्हाण यांना अर्पण केले. शब्दांना महत्त्व देणाऱ्या या नेत्याच्या राजकीय कारकीर्दीला १९८० नंतर उतरती कळा लागली. इंदिरा गांधींकडून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. मात्र, त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नालाही त्यांनी अत्यंत संयत भाषेत उत्तर दिल्याचे अॅड. जाधव यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/SLEkFQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬