[navi-mumbai] - कॅमेऱ्यांमुळे पोलिसांवरील भार कमी

  |   Navi-Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

एखादा गुन्हा घडला की, गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागायचे. मात्र आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीची झटपट ओळख पटविण्यास पोलिसांना मदत होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून टिपण्यात येते आणि ई-चलन तयार केले जाते. परिणामी सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या कामाचा भार बराच कमी झाला आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी हा सुरक्षा यंत्रणांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठा अडथळा आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहतुकीचे नियमन करण्यासाठीही वाहतूक विभागाकडून उपयोग केला जातो. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीही पोलिसांना या यंत्रणेचा चांगलाच फायदा होत आहे. सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, मर्यादेपेक्षा जलद गतीने वाहन चालविणे असे नियम मोडणाऱ्यांच्या मागे आता पोलिस लागत नाहीत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अशांना टिपण्यात येते आणि ई-चलन तयार केले जाते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PUXmwQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬