[navi-mumbai] - खासगी संस्थांतील शिक्षक भरती सरकार करणार?

  |   Navi-Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाने 'पवित्र पोर्टल' संदर्भात निर्णय देताना उमेदवार निवडीचे स्वातंत्र्य संस्थाचालकांना दिले असले, तरी आता ते फार काळ टिकणार नाहीत. या कारभारात अधिक पारदर्शकता यावी, या उद्देशाने सरकार 'महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी' कायदा, १९७७ मध्ये सुधारणा करणार आहे. यानुसार हे अधिकार सरकारकडेच असतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये केवळ 'पवित्र'मार्फतच शिक्षक नियुक्ती करण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध घोषित केले असून शाळा व्यवस्थापनाला शिक्षक निवड व नियुक्तीचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला. तर शाळांनी 'पवित्र'मार्फत तयार होणाऱ्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांची निवड करावी, असे निकालात स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने २२ जून २०१७ रोजी काढलेल्या अध्यादेशात महाराष्ट्र खासगी शाळा शिक्षक व कर्मचारी नियमात सुधारणा केली. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांसाठी पात्रता आणि अभियोग्यता परीक्षा बंधनकारक करण्यात आली. तर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी अभियोग्यता परीक्षा आवश्यक करण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vGufnAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬