[navi-mumbai] - 'मृद्गंध' वरून उमप बंधू आमने-सामने

  |   Navi-Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या 'मृद्गंध' पुरस्कारावरून उमप बंधूंमध्ये सध्या वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. विठ्ठल उमप यांच्या जयंतीदिनी जुलैमध्ये आणि स्मृतिदिनी नोव्हेंबरमध्ये दोन्ही वेळा 'मृद्गंध' नावानेच पुरस्कार दिला जातो. त्यामुळे संदेश उमप आणि नंदेश उमप ही दोन्ही भावंडे या वादात समोरासमोर आली आहे.

शनिवारी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन संदेश उमप यांनी वडिलांच्या मृत्युनंतर २०११पासून हा पुरस्कार सोहळा विठ्ठल उमप यांच्या जयंतीनिमित्त करत असल्याची माहिती दिली. मात्र पुरस्काराला हेच नाव आणि तशाच प्रकारची ट्रॉफी देत असल्याने संदेश उमप यांनी आक्षेप नोंदवला आहे. हा आक्षेप गेल्या वर्षीही नोंदवला होता. मात्र तीच बाब यावर्षीही समोर आल्याने माध्यमांसमोर येऊन हा आक्षेप मांडत असल्याचे संदेश उमप यांनी सांगितले. विठ्ठल उमप थिएटर्सच्या वतीने जुलैमधील पुरस्कार देत असल्याची माहिती संदेश उमप यांनी यावेळी दिली. आज, सोमवारी विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनी लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे नंदेश उमप यांनी मृद्गंध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे हे पुरस्कार याच नावे दिल्यास डिसेंबरपासून दिग्गज कलाकारांना घेऊन जांभूळ आख्यानचे कार्यक्रम सुरू करण्याचा इशाराही यावेळ संदेश उमप यांनी नंदेश उमप यांना दिला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/jJT56QAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬