[navi-mumbai] - शहरात टोइंग नियम धाब्यावर

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नो पार्किंगमध्ये वाहने पार्क केली असल्यास ती वाहने 'टो' करण्यापूर्वी व्हॅनने सायरन वाजवत अनाऊन्समेंट करणे आवश्यक आहे. मात्र टोइंग वाहनांवरील नवी मुंबई वाहतूक पोलिस सायरन वाजवत नसल्याचे निदर्शनास येत आहे. चार चाकी वाहनांना परस्पर जॅमर लावला जातो. तर दुचाकी उचलून वाहतूक चौकीजवळ आणून चालकांकडून दंड आकारला जातो. या मनमानी कारभारामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांचे पोलिसांसोबत वादाचे प्रसंग घडतात.

वाहने उचलण्यापूर्वी सायरन वाजवणे तसेच अनाऊन्समेंट करावी, असा नियम आहे. यामुळे वाहनचालकाला तिथल्या तिथे दंड देऊन गाडी सोडवता येते. पण या नियमाचे पालन केले जात असल्याने चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहने टो करत असताना तत्काळ सोडल्यास टोइंगचे शुल्क भरावे लागणार नसल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला असता. मात्र टोइंग करून वाहने पोलिस चौकीजवळ नेली जात असल्यामुळे हे शुल्क भरून दंड भरावा लागत आहे. वाहतूक पोलिसांकडून सायरन तसेच अनाऊन्सेंट करणे आवश्यक आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी तसे केल्यास वाहनचालक त्या ठिकाणी येऊन पोलिसांशी हुज्जत घालतात. त्यामुळे सायरन वाजवण्यात येत नाही. तसेच यामुळे अनेकदा नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागतो, असे एका वाहतूक पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यासंदर्भात नवी मुंबई पोलिस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/RJyptwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬