[navi-mumbai] - सुरक्षा बंकर झाले गायब

  |   Navi-Mumbainews

बुलेटप्रूफ जॅकेटच्या दर्जाबद्दलही पोलिसांमध्येच संभ्रम

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईची सुरक्षा पोकळ असल्याचे समोर आले. पुन्हा असा अचानक हल्ला झाला तर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात आल्या. त्यापैकी एक उपाययोजना होती ती बंकरची. महत्त्वाची रेल्वे स्थानके, संवेदनशील ठिकाणी असे सुमारे १८० बंकर उभारण्यात आले. अवघ्या दहा वर्षातच हे बंकर दिसेनासे झाले आहेत. दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी खाकी वर्दीतील शस्त्रधारी पोलिस बंकरआडून समाजकंटकांवर करडी नजर ठेवत होते. अनेक पोलिस ठाण्यांबाहेरही हे बंकर उभारण्यात आले होते. या बंकरमध्ये उभ्या असलेल्या शस्त्रधारी पोलिसांचा एक वेगळाच दरारा होता. सुरुवातीला काही दिवस हे बंकर स्वच्छ आणि टापटीप दिसले. पोलिसही जोमाने या बंकरमध्ये काम करताना दिसले. पहाऱ्यासाठी उभारलेल्या बंकरपैकी काही गायब आहेत. काही ठिकाणी बंकर आहेत परंतु त्यांची पडझड झाली आहे. अनेक बंकरमध्ये कचरा आणि घाण आहे काही तर भिकारी-गर्दुल्ल्यांचे अड्डे बनले आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/nwtUOgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬