[pune] - जमिनीच्या वादातून कोयत्याने वार

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

जमिनीच्या वादातून चुलत भावाने लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून, शनिवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोयाळी, खिरपाडवस्ती येथे ही घटना घडली.

बाबूराव नामदेव कोळपे (२७, रा. कोयाळी, खिरपाडवस्ती, ता. खेड) यांनी या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली; तर अजय उर्फ बापू भाऊसाहेब कोळपे (रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे), राजेंद्र जांभळकर (रा. उरळगाव, ता. शिरूर) या दोघांसह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूराव आणि अजय या दोघांची कोयाळी येथे सामायिक जमीन आहे. त्या जमिनीच्या वादातून अजय याने बाबूरावच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केले. अजय आणि त्याच्या साथीदारांनी बाबूरावांच्या कुटुंबीयांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. भांडणात बाबूराव यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हरविली. मारहाण करून निघून जाताना आरोपींनी कारमधून पिस्तूल दाखवून बाबूराव आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_zvOJgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬