[mumbai] - मुंबईः तरुणीच्या छातीतून काढली ३.५ सेंटीमीटरची पिन

  |   Mumbainews

मुंबईः

चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका १८ वर्षीय तरुणीच्या फुफ्फुसात ६ दिवस अडकून असलेली पिन आधुनिक ब्रॉन्कोस्कोपने यशस्वीपणे बाहेर काढली. २७ नोव्हेंबर रोजी या तरुणीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी ब्राँन्कोस्कोपने पिन बाहेर काढण्यात आली.

ही तरुणी २१ नोव्हेंबर रोजी गोव्यामध्ये होती. स्कार्फ परिधान करत असताना अनवधानाने तोंडात धरलेली पिन गिळली गेली. तिला लगेचच गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पिन नक्की कुठे अडकली आहे, ते शोधण्यासाठी एक्स-रे काढण्यात आला. त्यांनी एण्डोस्कोपीनं पिन काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. त्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण, तेथेही पिन काढण्यात यश मिळाले नाही. पुढील उपचार मुंबईत घेण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला आणि ते झेन हॉस्पिटलमध्ये पोहोचले....

फोटो - http://v.duta.us/r2B1PAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fqq_JgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬