[mumbai] - सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

  |   Mumbainews

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी रेल्वेचं बदलेलं वेळापत्रक नक्की बघा. विद्याविहार ते मशिद स्थानकांदरम्यान अप-धिम्या मार्गासह हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेनं आज मेगाब्लॉक घोषित केला आहे. विद्याविहार ते मशिद स्थानकांदरम्यान आज अप धिम्या मार्गावर सकाळी ११ वाजून २० मिनिटं ते दुपारी ४ वाजून २० मिनिटांपर्यंत दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

ट्रान्स हार्बर मार्गवरील लोकल सेवाही सकाळी १० वाजून १२ मिनिटं ते दुपारी ४ वाजून २६ मिनिटांपर्यंत बंद राहणार आहे. पश्चिम रेल्वेवरील भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ryjRfAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬