[ahmednagar] - कौटुंबिक कलह उफाळणार?
महापालिका निवडणूक; उमेदवारीचे सर्वांनाच डोहाळे
म. टा. प्रतिनिधी, नगर
नगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकांना उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. यात विद्यमान नगरसेवकांच्या कुटुंबांतील सदस्यांचाही समावेश असल्याने ऐन निवडणुकीत कौटुंबिक कलह उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील चर्चा महापालिकेत जोरात आहे. कोठे काय चालले आहे व कोठून कोण उभे राहात आहे, कोण कोणत्या पक्षाच्या वळचणीला जाणार आहे, याच्या खुमासदार चर्चांसह संभाव्य कुटुंब कलह व भाऊबंदकीही दबक्या आवाजात चर्चेत आहे.
नगरमध्ये नगरपालिका असल्यापासून काही कुटुंबातील सदस्य नगरसेवक आहेत. महापालिका झाल्यानंतरही याच कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य नगरसेवक झाले आहेत. यापैकी काहींनी महापालिकेची विविध पदेही भूषवली आहेत. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीत या कुटुंबातील नवी पिढी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे; मात्र, जुन्या पिढीशी त्यांचा य़ातून संघर्ष सुरू झाला आहे. काका-पुतणे, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, मामा-भाचे यासह अन्य नात्यागोत्यात यामुळे कटुता येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र, याचीच चर्चा महापालिकेत जास्त आहे....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/e8pqfQAA