[ahmednagar] - काशीविश्वेश्वराचा गाभारा महिलांना खुला

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

गुंजाळवाडी (ता. संगमनेर) गावातील काशीविश्वेश्वराच्या प्राचिन मंदिरामध्ये महिलांना बंदीची परंपरा यंदाच्या तिसऱ्या श्रावण सोमवारी खंडित झाली. सोमवारी (२७ ऑगस्ट) महिलांनी 'हर हर महादेव'चा गजर करीतच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. काशीविश्वेवर मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या ग्रामस्थांच्या ऐतिहासिक निर्णयाचे महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे.

संगमनेर शहरालगत असलेल्या गुंजाळवाडी येथील काशीविश्वेश्वर मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. प्राचिन काळातील या मंदिरात पूर्वी महिलांना दर्शनासाठी प्रवेश होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महिलांना मंदिर गाभाऱ्यातील प्रवेशास बंदी घातली गेली होती. पंचक्रोशीतील महिलांनी अनेकदा दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. गावातील तंटामुक्ती समितीसमोर हा प्रश्न मांडण्यात आला. गावातील अनिष्ट प्रथा व चालीरिती नष्ट करण्याचे उद्दिष्ट तंटामुक्ती समितीचे असल्याचे गृह विभागाने १४ ऑगस्ट २००८ रोजी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन तंटामुक्ती समितीने २१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, अशी सूचना केली. ग्रामस्थांनीदेखील या मागणीला पाठिंबा दिला. त्यानुसार काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना अटकाव न करता गाभाऱ्यामध्ये प्रवेश द्यावा, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. मंदिर प्रशासनाला या ठरावाची माहिती देऊन महिलांना प्रवेश नाकारल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. अखेर मंदिर प्रशासनानेसुद्धा तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून काशीविश्वेश्वराच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यास सोमवारपासून सुरुवात केली. त्यानंतर काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन शेकडो महिलांनी दर्शन घेतले. मंदिर कमिटीने सहकार्य करून तत्काळ महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/P0xTsAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬