[ahmednagar] - पिकअप उलटून वीस जखमी

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

अकोले तालुक्यात रुंभोडी गावाजवळ मजूर घेऊन निघालेली पिकअप वाहन उलटून झालेल्या अपघातात वीस शेतमजूर जखमी झाले. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. अकोले तालुक्यातील पाडाळणे, निंब्रळ, विटे या तीन गावांतील हे शेजमजूर आहेत. गंभीर असलेल्या चौघांवर संगमनेर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

पिकअप वाहनामधून मजूर इंदोरी, रुंभोडी येथे चालले होते. यात लहान मुलेही होती. पावसामुळे रस्त्यात चिखल झालेला आहे. उताराच्या रस्त्यावरवरून पिकअप जात असताना निसरड्या भागात रस्त्यावरून गाडी घसरली. मजुरांच्या आरडाओरड्यामुळे परिसरातील नागरिक मदतीला धावले. त्याचवेळी आमदार वैभवराव पिचड हे अकोलेकडे येत होते. तेही अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. सर्व जखमींना विविध वाहनांमधून अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात ताराबाई अशोक पथवे, सखुबाई भाऊसाहेब पथवे, सनू बाळू मेंगाळ, रवींद्र लक्ष्मण गांगड, संतोष बाळू मेंगाळ, प्रियंका बाळू मेंगाळ, मधू सुभाष मेंगाळ, लक्ष्मण संतू सांगड, जाईबाई पंढरीनाथ मेंगाळ, प्रदीप भाऊराव सावंत, सीमा प्रदीप सावंत, रामनाथ गोविंद मधे, सलोनी रामनाथ मधे, सानिका रामनाथ मधे (वय १३) कार्तिक रामनाथ मधे (वय १०), ताईबाई नवनाथ मेंगाळ, सोन्याबाई नाराय़ण मेंगाळ, लता भागवत कडाळी, केशव रामनाथ मुठे हे जखमी झाले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/b8BlKAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬