[ahmednagar] - पोलिसांनी घेतल्या शाळा दत्तक

  |   Ahmednagarnews

\Bमुलींच्या सुरक्षेसाठी \B३५ ठिकाणी उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नगर

शालेय मुलींची छेडछाड रोखण्यासाठी आता पोलिस प्रशासनानेच पावले उचलली आहेत. रक्षाबंधनानिमित्त मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी शाळा दत्तक योजना सुरू केली असून, शहरातील शाळा, क्लास अशा ३५ ठिकाणी पोलिस दक्ष राहणार आहेत. प्रत्येक मुलीजवळ पोलिसाचा नंबर देण्यात आला आहे. मुलीने तक्रार केल्यानंतर काही वेळेतच पोलिस कर्मचारी मदतीला जाईल, असा या उपक्रमामागील उद्देश आहे.

शाळा, क्लासबाहेर टवाळखोर तरुण हिंडण्याच्या घटना वाढल्या आहेत. हे टवाळखोर मुलींची छेड काढतात. शाळेत जाताना, घरी येताना मुलींना त्रास देतात. मात्र, त्यांना समजून सांगणारे पालक, शाळेतील शिक्षक यांना मारहाण होते. या प्रकरणी गुन्हेही नोंदविले जातात. छेडछाडीच्या अशा घटनांनंतर पोलिस काही दिवस शाळांबाहेर गस्त घालून टवाळखोरांवर कारवाई करतात. त्यानंतर काही दिवस हे प्रकार थांबतात; पण गस्त थांबल्यानंतर पुन्हा सुरू होतात. गेल्या आठवड्यात छेडछाडीमुळे बारामती येथे शाळकरी मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर नगरमधील छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी, मुलींबरोबर संवाद साधण्यासाठी नव्याने नगरला आलेले पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा दत्तक योजना सुरू केली. 'हे बंधन विश्वासाचे, हा धागा रक्षणाचा,' असे नाव देऊन रक्षाबंधनानिमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शाळांमध्ये, क्लासमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. समर्थ विद्या मंदिर, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये मिटके, पोलिस निरीक्षक संपत शिंदे, नितीनकुमार गोकावे यांनी हा उपक्रम सुरू केला. या वेळी मुलींनी पोलिसांना राख्या बांधल्या. पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक मुलींना देण्यात आले. एक शाळा एका पोलिस कर्मचाऱ्याला दत्तक देण्यात आली. मुलींनी तक्रार केल्यानंतर संबंधित पोलिस तत्काळ तक्रारीची दखल घेऊन मुलीला त्रास देणाऱ्यावर कारवाई करेल, असा हा उपक्रम आहे. त्याचबरोबर दामिनी पथकाची गस्त नियमितपणे सुरूच राहणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9Tp8CgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬