[ahmednagar] - महिला आजही दबलेल्या अवस्थेत-डॉ. ढेरे यांची खंत

  |   Ahmednagarnews

महिला आजही दबलेल्या अवस्थेत

डॉ. ढेरे यांनी व्यक्त केली खंत, आनंदोत्सव ट्रस्टच्या पुरस्काराने सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नगर

'समाज कितीही पुढे गेला असला तरी व विविध क्षेत्रात मुलांपेक्षा मुली पुढे असल्या तरी आजही स्त्रिया दबलेल्या अवस्थेतच आहेत. असुरक्षित व असहाय आहेत आणि जुन्या विचारात व कर्मकांडात अडकल्या आहेत', अशी खंत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी येथे व्यक्त केली. 'स्त्रियांच्या अशा स्थितीत विचारवंत व बुद्धीवंतांची संस्कृती निर्माण करून जागे राहण्याची व महिलांना दबलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्याची गरज आहे', असे प्रतिपादनही त्यांनी केले.

येथील आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध पुरस्कारांचे वितरण सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, शारदा-दुर्गा पुरस्कार डॉ. अरुणा ढेरे यांना व प्रज्ञावंत गौरव पुरस्कार सुफी गायक पवन नाईक यांना देण्यात आला. या वेळी डॉ. एस. एम. बागवान, भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले, आनंदोत्सव ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे व उषा सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mvchhAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬