[ahmednagar] - वाहनचालकांबरोबर रक्षाबंधन साजरे

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर शहरातील इम्पिरियल चौक येथे सोमवारी महिला पोलिसांनी वाहनचालकांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. एसटी बसचे चालक, वाहक, चारचाकी वाहनाचे चालक, रिक्षाचालक, मोटारसायकलस्वार यांना पोलिस प्रशासनातर्फे राखी बांधण्यात आली. राखी बांधल्यानंतर हेल्मेट वापरणे, सिल्टबेल्ट वापरणे तसेच ट्रीपल सीट न जाणे, अतिवेगाने वाहने न चालविणे व इत्यादी वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सूचनाही वाहनचालकांना देण्यात आल्या. या वेळी शहराचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे, पोलिस उपनिरीक्षक जया तारडे यांच्याबरोबर महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होते. इम्पिरियल चौकात पोलिस नेहमी बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करतात. बसस्थानकाबाहेरील रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. आज मात्र या रिक्षाचालकांना महिला पोलिसांनी राख्या बांधल्या.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2a22cAEA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬