[ahmednagar] - शेतमाल खरेदी बंद संपास संमिश्र प्रतिसाद

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

सध्या कृषी उपन्न बाजार समित्यांमध्ये येणारा शेतमाल हा चांगल्या प्रतीचा नाही. त्यामुळे आधारभूत किंमतीत हा माल घेण्यास नगरच्या व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविली आहे. सोमवारपासून (२७ ऑगस्ट) शहरासह जिल्हाभरात सर्व प्रकारचा शेतमाल उतरवून घेणे बंद करण्याचा निर्णय व्यापारी प्रतिनिधींनी घेतला होता. व्यापाऱ्यांच्या या संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी संपाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून नगर बाजार समितीत व्यापाऱ्यांनी शेतमाल उतरवून घेतला. मंगळवारपासून मात्र संप कडकडीत करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

आधारभूत किंमतीच्या खाली शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा आणि त्यासाठी पणन कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. त्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. या जाचक निर्णयामुळे व्यापारी वर्गात दंड व शिक्षेची मोठी भिती पसरली असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. राज्य सरकारच्या या व्यापारी विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी व्यापारी वर्गाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आंदोलन केले जात आहे. संपाच्या आजच्या पहिल्या दिवशी बाजार समितीत शेतमालाची आवक झाली होती. या वेळी मात्र बहुतांश व्यापाऱ्यांनी सहकार्याची भुमिका घेतली. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी शेतमाल उतरवून घेतला. मंगळवारपासून मात्र संप कडकडीत करणार असून शेतमाल उतरवून घेतला जाणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_wwKTAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬