[aurangabad-maharashtra] - खासगीकरणाच्या विरोधात संघर्ष समिती, आपची निदर्शने

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या पीपीपी तत्वावरील कराराचे पुनरुज्जीवन करून पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यास समन्वय संघर्ष समिती आणि आपतर्फे महापालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

समांतर जलवाहिनीच्या कराराच्या पुनरुज्जीवनाबद्दल सोमवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालिका मुख्यालयाच्या समोर समन्वय संघर्ष समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला देऊ नका, नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी द्या, पाणीपट्टी कमी करून १८०० रुपये करा, टँकरचे दर तीन महिन्यांसाठी २५० रुपये करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. निदर्शनात राहुल इंगळे, डॉ. गफार कादरी, भारत गायकवाड आदी सहभागी झाले होते.

पाणी पुरवठ्याच्या खासगीकरणाच्या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे देखील महापालिकेच्या समोर निदर्शने करण्यात आली. खासगीकरणाचा करार रद्द करा, पाणीपट्टी पुर्वीप्रमाणे १८०० रुपये करा, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी अजबराव मानकर, सिद्धार्थ बनसोडे, महमद बशीर, रामेश्वर भारती, अशीर जयहीद, सतीश संचेती, सुग्रीव मुंडे आदी सहभागी झाले होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/XYBpOwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬