[aurangabad-maharashtra] - पाण्याचे राजकारण करू नका

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हमीपत्राच्या आडून शिवसेना पाण्याचे राजकारण करीत आहे. पाण्याचे राजकारण करू नका. एक तर शहरवासियांना तुम्ही पाणी द्या, नाही तर आम्ही पाणी देऊ, अशा शब्दात भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवकांना सुनावले आहे.

सर्वसाधारण सभा संपल्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, शहराच्या हितासाठी समांतर जलवाहिनीचे काम झाले पाहिजे यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी व्हीसी घेतली. आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली. असे असताना लेखी हमीची अट कशासाठी? समांतर जलवाहिनीचे काम स्वबळावर करण्याची महापालिकेची किंवा शिवसेनेची ताकद आहे का, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना उगीचच राजकारण करीत आहे. यामागे खासदार चंद्रकांत खैरे यांची फूस आहे. खैरे यांच्या सांगण्यामुळेच हे सर्व घडत आहे, असा आरोप करून तनवाणी म्हणाले, जनता त्यांना माफ करणार नाही. शिवसेनेने राजकारण करताना शहराचा विचार केला पाहिजे, आपली मुले याच शहरात राहणार आहेत याचाही त्यांनी विचार केला पाहिजे, असे तनवाणी म्हणाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/WAo8IQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬