[aurangabad-maharashtra] - परभणीत आरक्षणासाठी ढोल जागर
परभणी: धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, यासह इतर मागण्यांसाठी परभणी, पालम व पाथरी येथे धनगर समाजाच्या वतीने ढोल-जागर आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना देण्यात आले.
परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी काहीकाळ ठिय्या दिला. त्यासोबतच या ठिकाणी ढोल बडवून राज्य सरकारला प्रतिकात्मकरित्या जागे करण्यासाठी ढोल-जागर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात सुरेश भुमरे, मारोती पहेलवान बनसोडे, गणेश मिरसे, विलास लुबाले, प्रा. तुकाराम साठे, विष्णू सायगुंडे, राजेश बालटकर, केशव अवाड, अंकुश गलांडे, चंद्रकांत बसुले, सुभाष तिडके, गोरख मात्रे, माणिक गिराम, तुळशीराम गिराम, रमेश बनसोडे आदींसह समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यासोबतच पालम येथे समाज बांधवांनी गावातून मोर्चा काढून तहसील कार्यालयात ढोल वाजवून जागर केला. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/AY96OAAA