[aurangabad-maharashtra] - मेहंदीच्या सुटकेसाठी आलेल्यांना बेड्या

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गँगस्टर इम्रान मेहंदीची सुटका करण्यासाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या सात शार्पशूटरसह स्थानिक तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सोमवारी सकाळी नारेगाव परिसरात हा थरारक प्रकार घडला. मेहंदीला सुनावणीसाठी कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार करून त्याची सुटका करण्याचा या टोळीचा डाव होता. मात्र, शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव वेळेपूर्वीच उधळला गेला.

कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याची सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात सलीम कुरेशी हत्या प्रकरणात सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान त्याला हर्सूल जेलमधून कोर्टात आणण्यात येणार होते. त्याला जेलमधून बाहेर काढल्यानंतर पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार करून मेहंदी याची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मध्यप्रदेश येथील हे हल्लेखोर असल्याची माहिती देखील गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी पहाटे पाच वाजेपासून सापळा रचला होता. दिल्लीगेट भागात सकाळी संशयित तवेरा कार आढळली. या कारचा पाठलाग करण्यात आला. नारेगाव चौकात सापळा रचून दुचाकीवरील दोन जण व तवेरा कारमधील सात जणांना रिवॉल्वर रोखून ताब्यात घेण्यात आले. यावेळी दुचाकीवरील एका आरोपीने पोलिसांवर पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्याला झडप टाकून पकडण्यात यश आले. पकडलेल्या आरोपीमध्ये शब्बीरखान (वय २२), फैजुल्लाखान गणीखान (वय ३७), शाकीरखान कुर्बानखान (वय ४०), नफीसखान मकसूदखान (वय ४०), नकीबखान रयाज मोहम्मद (वय ५५), फरीदखान मन्सूरखान (वय ३५), सरूफखान शकूरखान (वय ४५ सर्व रा. जिल्हा खरगोन व धार, मध्यप्रदेश) यांच्यासह शेख यासेर शेख कादर (वय २३ रा. कौसरपार्क, नारेगाव), सय्यद फैसल सय्यद ऐजाज (वय १८ रा. किलेअर्क), मोहम्मद नासेर मोहम्मद फारूख (वय २४ रा. चंपा चौक), व मोहम्मद शोयेब मोहम्मद सादेक (वय २८ रा. जाहेदनगर) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे घाडगे, उपायुक्त निकेश घाटमोडे पाटील, एसीपी नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय घनश्याम सोनवणे, पीएसआय अनिल वाघ, अमोल देशमुख व पथकाने केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pI1VnQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬