[aurangabad-maharashtra] - हल्ल्याचा मनसुबा पोलिसांनी उधळला

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुपारी किलर इम्रान मेहंदीला सोडविण्यासाठी त्याचे जामीनावर सुटलेले साथीदार खालेद व शोएबने कट रचला. मात्र, पोलिसांच्या गाडीवर हल्ला होण्यापूर्वीच, हा मनसुबा नियोजनबद्ध पद्धतीने आरोपींवरच उलटविण्यात आला. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात सोमवारी मेहंदीला कोर्टात हजर करण्यात आले. चित्रपटालाही लाजविणाऱ्या या थरारनाट्यात पोलिसांची भूमिका उजळून निघाली.

पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार करून इम्रान मेहंदीला पळवून नेण्याच्या कटाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर रविवारी रात्री पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, निकेश घाटमोडे पाटील अशा मोजक्या अधिकऱ्यांनी नियोजन करून पथकांना त्यांची कामे वाटून दिली. इम्रान मेहंदीला कोर्टात आणण्याऐवजी त्याची हर्सूल जेलमधूनच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी करण्याचे ठरवले. मात्र, तुरुंगातील खराब वायरमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर पोलिसांनी वायरिंग बदलले. मात्र, मेहंदीने व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये स्पष्ट ऐकू येत नाही, असा कांगावा करत कोर्टासमोर हजर करण्याची मागणी केली. यामुळे त्याला कोर्टात आणण्याशिवाय पोलिसांपुढे पर्याय नव्हता....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/k9aWQwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬