[beed] - शहरातील भाजी मार्केट रखडले
शहरातील भाजी मार्केट रखडले
इमारतीतील असुविधांचे कारण; शेतकऱ्यांचीही होतेय दिशाभूल
म. टा. प्रतिनिधी, नगर
सावेडीतील प्रोफेसर कॉलनी येथे महापालिकेच्या इमारतीत सेंद्रीय भाजीपाला मार्केट सुरू करण्याच्या कृषी विभागाच्या प्रयत्नांना अपयश आले आहे. मार्केट सुरू करण्यासाठी महापालिकेने करारनामा करण्याबाबत कृषी विभागास पत्र पाठवले आहे. कृषी विभागाकडून मात्र यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. भाजी मार्केट ज्या इमारतीत सुरू होणार आहे, तेथे अस्वच्छता आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नाही. नुसतेच ओटे बांधण्यात आले आहेत, अशा अडचणी समोर आल्याने मार्केट सुरू होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची चिन्हे आहेत.
सावेडीत टीव्ही सेंटर येथे तहसील कार्यालयासमोर महापालिकेचे भाजी मार्केट आहे. या मार्केटमध्ये ७२ ओटे बांधण्यात आले आहेत; परंतु, हे मार्केट अनेक वर्षांपासून बंद असल्याने येथे अस्वच्छता वाढली आहे. जागोजागी कचरा साचला आहे. इमारतीची दुर्दशा झाली आहे, तसेच येथे मार्केटसाठी पुरेशा सुविधा नसल्याचे समोर आले आहे. ओटे बांधले असले, तरी शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी येथे काहीच व्यवस्था केलेली नाही. जिल्हाभरातून येथे शेतकरी येणार आहेत. एखाद्या दिवशी शेतमालाची विक्री झाली नाही, तर पुन्हा शेतमाल गावाकडे घेऊन जाणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. इमारतीत अस्वच्छताही वाढली आहे. महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने इमारतीची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. त्यामुळे असुविधांचे आगर असलेल्या या इमारतीत मार्केट सुरू करणे शक्य होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने इमारतीत या सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय येथे मार्केट सुरू करता येणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जवळपास दोन वर्षांनंतरही कृषी विभागास मार्केट सुरू करता आले नाही, तसेच सेंद्रीय शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देता आली नाही. या प्रकल्पामध्ये 'आत्मा' अंतर्गत येणारे ३६ गट, १४ शेतकरी उत्पादक कंपन्या यांना सर्वांत प्रथम सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर गटांची संख्या वाढवण्यात येणार आहे....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0j15ugAA