[jalgaon] - आपसात भांडण्यापेक्षा जनतेची कामे करा

  |   Jalgaonnews

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना महाजनांकडून कानपिचक्या

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांमध्ये आपापसात वाद सुरू आहेत. हे वाद जाहीररित्या सुरू असल्याने रविवारी जळगावात आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘आपसात भांडणे करण्यापेक्षा जनतेची कामे करा’ अशा शब्दांत या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

जळगाव जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. मात्र, कुठल्या ना कुठल्या कारणामुळे काही दिवसांपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्यात वाद सुरू आहेत. आपसातील या वादामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांवरही विपरित परिणाम होत आहे. पदाधिकाऱ्यांच्या वादाचा फायदा घेऊन अधिकारीदेखील निष्क्रिय झाल्याचे चित्र जिल्हा परिषद प्रशासनात निर्माण झाले आहे. या जाहीर वादांबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना समजल्यावर त्यांनी रविवारी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या निवासस्थानी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी अध्यक्ष उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित होते. या वेळी गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/84MGOgAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬