[jalgaon] - कर्मचारी सुनावणीसाठी समिती

  |   Jalgaonnews

शिष्टमंडळाची आयुक्तांसोबत चर्चा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेतील बडतर्फ कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर याबाबत आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त चंद्रकांत डांगे यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी आयुक्तांना कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेण्याबाबत चर्चा केली. यावर आयुक्तांनी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने नेमून बडतर्फ करण्यात आलेल्या ७९ कर्मचाऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार बाजू ऐकून घेणार असल्याचे आश्वासन दिले.

महापालिकेच्या अग्निशमन विभागातील बडतर्फ कर्मचारी वाल्मिक सपकाळे यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यामुळे सर्वच बडतर्फ कर्मचाऱ्यांनी आपली बाजू ऐकून न घेता बडतर्फ करण्यात आल्याची तक्रार केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार सुरेश भोळे व माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांची भेट घेतली होती. त्यानुसार सोमवारी आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेतली. या वेळी माजी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक दत्तात्रय कोळी, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wE1yywAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬