[jalgaon] - जळगाव शहर हागणदारीमुक्त

  |   Jalgaonnews

केंद्रीय समितीचे शिक्कामोर्तब

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

राज्य आणि केंद्र शासनाच्या समितीने जळगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय त्रयस्थ समितीने शहराची पाहणी केली होती. जळगाव शहर हागणदारी मुक्तीवर या समितीने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतचे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.

जळगाव शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी उघड्यावर शौच करणाऱ्या ठिकाणांचे प्रशासनातर्फे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार ५८ ठिकाण निश्‍चित करून हागणदारीमुक्त शहरासाठी प्रशासनाने पाऊल उचलले. उघड्यावर शौचास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी राज्य शासनातर्फे १२ हजार आणि महापालिकेतर्फे ५ हजार असे एकूण १७ हजारांचे अनुदानदेखील लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. शहरातील ५८ ठिकाण हागणदारीमुक्त झाल्याचा दावा केल्यानंतर राज्य शासनाच्या समितीने पाहणी करून दि. २८ सप्टेंबर २०१७ रोजी हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय समितीने तपासणी करून दि. ९ जानेवारी २०१८ रोजी घोषणा केली. राज्य आणि केंद्रीय समितीने जळगाव शहर हागणदारीमुक्तीची घोषणा केल्यानंतर पुन्हा सहा महिन्यांनी केंद्रीय त्रयस्थ समितीने दि. ८ ऑगस्ट रोजी शहराची पुनर्तपासणी केली होती.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bBIXzwAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬