[jalgaon] - विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

  |   Jalgaonnews

सलसाडीतील संतप्त ग्रामस्थांचा तहसीलदारांवर हल्ला

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सलसाडीच्या शासकीय आश्रमशाळेत सोमवारी सकाळी एका शाळकरी विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर त्या ठिकाणी गेलेल्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदारांवर संतप्त ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. यात दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली.

नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील सलसाडी गावातील शासकीय आश्रमशाळेत सोमवारी (दि. २७) सकाळी सहा वाजता डीपीचा शॉक लागून पाचवीतील सचिन चंद्रसिंग मोरे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर पालकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. आश्रमशाळेत सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचाही या वेळी आरोप करण्यात आला. जोपर्यंत प्रकल्प अधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/HPn1MAAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬