[jalgaon] - हॉकर्ससाठी ‘टायमिंग झोन’!

  |   Jalgaonnews

शहरात ‘सम-विषम’ तारखेनुसार पार्किंगचे लॉट; आयुक्त डांगे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव शहरातील सर्वात मोठा अतिक्रमण व पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आता पुढाकार घेतला आहे. शहरातील हॉकर्स व नो-हॉकर्स झोनचे पुनर्सर्व्हेक्षण करून टायमिंग झोन देत हॉकर्सचा प्रश्न सोडविणार असल्याची माहिती आयुक्त डांगे यांनी दिली. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर सम-विषम तारखेनुसार पार्किंग लॉट तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

जळगाव शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ परिसरासह उपनगरामध्ये अतिक्रमणाची समस्या वाढली आहे. गेल्यावर्षी शहरातील रहदारीचा भाग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून नो-हॉकर्स झोन व हॉकर्स झोन तयार करण्यात आले होते. त्यानुसार सुरुवातीस हॉकर्स यांना विश्वासात घेऊन स्थलांतराची प्रक्रिया पार पडली. मात्र, काही दिवसांनी पुन्हा ही प्रक्रिया बारगळल्यानंतर सर्व हॉकर्ससाठी एकच ख्वॉजामियाँ चौकातील झोपडपट्टीची मोकळी जागा सुभाष चौक, शिवाजी रोड व इतर रस्त्यावरच्या हॉकर्सला देण्यात आली. तसेच गोलाणी मार्केटजवळील खाऊगल्लीत टाइम झोननुसार हॉकर्सला परवानगी देण्यात आली. शिवाजी पुतळ्यासमोरच्या रस्त्यावरील हॉकर्सला ट्राफिक गार्डनजवळील जागा देण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/c0s7LwAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬