[kolhapur] - आर्मीत भरतीसाठी तरुणाची ‘टॉवर चढाई!’

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा, सांगली

आर्मीत भरती करण्याचे आव्हान देत वाळवा तालुक्यातील इटकरे येथील अनिल कुंभार हा तरुण सोमवारी येथील बीएसएनलच्या टॉवरवर चढून बसला आणि पोलिसांसह अग्निशमन दलाची धावपळ उडाली. सुमारे चार तास त्याने यंत्रणांना वेठीस धरले. 'मला लेखी उत्तर द्या, नाहीतर मी उडी मारतो,' अशी धमकी देत त्याने यंत्रणेला वेठीस धरले. सुमारे सहाशे फूट उंचीच्या टॉवरवरुन तो धमकावत असल्याने त्याला सुरक्षित खाली उतरविण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर होते. सुमारे चार तासानंतर तो खाली उतरला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

इटकरेत राहणारा कुंभार हा पाठीला सॅक लावून स्टेशन चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बीएसएनल कार्यालयाच्या आवारातील टॉवरवर चढून बसला. आर्थिक स्थिती बेताचीच असलेल्या अनिलचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. शेती आहे मात्र पुरेसे उत्पन्न मिळत नाही. दोन-तीन वेळा तो सैन्य भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. परंतु यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे निराश झालेल्या अनिलने बीएसएनएल टॉवरवर चढला. आपल्याकडे कुणी लक्ष देत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यानेच पोलिस आणि अग्निशमन दलाला फोन केला त्यानंतर यंत्रणांची धावपळ सुरु झाली. वास्तविक, टॉवरच्या ठिकाणी सुरक्षा गार्ड असतो. बीएसएनएलचे कार्यालयही रखवालदार नियुक्त असलेल्या गेटच्या आत आहे. असे असतानाही हा तरुण टॉवरवर कसा काय चढला‌? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकाराने बीएसएनची यंत्रणाही हडबडून जागी झाली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Vx1OAwEA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬