[kolhapur] - गटशिक्षण अधिकारी कमळकरांची बदली?

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा, कागल

वंदूर (ता. कागल) येथे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी गणपती कमळकर यांची जिल्हा परिषद मुख्यालयात बदली करण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते. याबाबतचे येत्या दोन दिवसांत असा आदेश काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वंदूरचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी सिद्धनेर्ली येथे राहत्या घरी १८ ऑगस्ट रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार वंदूरमधील अमर आवळे, अनिल कांबळे, अमर कांबळे, उत्तम कांबळे आणि दयानंद कांबळे यांनी शाळेच्या स्वच्छतागृहाचे दर्जेदार काम झाले नाही, असा ठपका ठेवत मोरे यांच्याकडे खंडणी मागितली होती. शिवाय जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली. वरिष्ठांचे अहवाल व्यवस्थित असताना तीन महिने छळ झाल्याने मोरे यांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवला आहे. याबाबत वंदूर आणि सिध्दनेर्ली ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करुन संशयितांना जबर शासन करण्याची मागणी केली आहे. मात्र संशयित मोकाट आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-RCzRQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬