[kolhapur] - न्यायाधीश उदय ललित यांचे रविवारी व्याख्यान

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कायदेतज्ज्ञ अॅड. अरविंद शहा यांच्या स्मृतिनिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश उदय ललित याचे व्याख्यान आयोजित केले आहे. शाहू स्मारक भवन येथे रविवारी (ता. २) सकाळी अकरा वाजता व्याख्यान होईल, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अॅड. अरविंद शहा यांनी विधी क्षेत्रात सुमारे ५५ वर्षांहून अधिक काळ काम केले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम करताना त्यांनी गाजलेल्या खटल्यांमध्ये पीडितांना न्याय मिळवून दिला. शहरातील विविध संस्थांसह शिवाजी विद्यापीठ, राष्ट्रीयीकृत बँकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या स्मृतिनिमित्त जिल्हा बार असोसिएशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने सुप्रिम कोर्टातील न्यायाधीश उदय ललित यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. न्यायाधीश ललित यांचा हिंदू वारसा हक्क कायद्याचा विशेष अभ्यास आहे. 'हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार महिलांचा वडिलोपार्जित मालमत्तेतील अधिकार' या विषयावर ते बोलणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म. आ. लव्हेकर आणि मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पटेल प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लॉ कॉलेजचे विद्यार्थी, पक्षकार आणि वकील या व्याख्यानास उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेसाठी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक चिटणीस, अॅड. संतोष शहा, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायण, न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य उदय सावंत, प्रा. सविता रासम आदी उपस्थित होते.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5C4GSgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬