[kolhapur] - पोटनियम दुरुस्तीवरुन शेतकरी संघात वादंग

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सामान्य नागरिक व शेतकरी सभासद या धोरणानुसार शेतकरी संघाची उभारणी झाली. एकेकाळी देशभर नावाजलेल्या संघाच्या कामकाज पद्धतीत काही कारभारी संचालकांनी मनमानी करत ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. संघाच्या निवडणुकीस उभे राहण्यासाठी व्यक्ती व संस्था सभासदांना २५००० रुपयांचे शेअर्स बंधनकारक करण्याचा प्रस्ताव हा सामान्य सभासदांवर अन्याय करणार असल्याच्या भावना आजी-माजी संचालकांनी मांडल्या. कारभारी संचालकांनी हा ठराव मंजूर केला तर त्याविरोधात कायदेशीर लढाई करू असा इशारा संबंधितांनी दिला.

संघाच्या काही संचालकांच्या मनमानी कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कार्यकारिणीची मान्यता न घेता नोकरभरती, संघाच्या मालकीच्या शाखा बंद करुन त्या खासगी व्यावसायिकांना भाड्याने देणे याकडेही आजी-माजी संचालक लक्ष वेधत आहेत. गारगोटीतील मौनी विद्यापीठाच्या व्यापारी संकुलातील संघाच्या मालकीचे चार गाळे खासगी व्यवसायिकाला भाड्याने दिले आहेत. याठिकाणची संघाची शाखा बंद केली. असाच प्रकार भोगावतीत झाला आहे. या ठिकाणी संघाची शाखा असताना लगतचे गोडावून मात्र खासगी व्यवसायासाठी भाड्याने दिला आहे. हा सारा कारभार संघाच्या उन्नतीसाठी की खासगी व्यावसायिकांच्या भल्यासाठी असा प्रश्न आता सभासद उपस्थित करत आहेत. भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयातील पहिला मजला गेली अनेक वर्षे वादात अडकला आहे. काही पंपावर उदारीवर इंधन विक्री सुरु असल्याकडेही लक्ष वेधत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/xvGUUQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬