[kolhapur] - मुंबईतील मोर्चात मंगळवार पेठेची ताकद दिसणार

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मुंबईत काढण्यात येणाऱ्या वाहन मोर्चास मंगळवार पेठेतील प्रत्येक गल्लीतून एक वाहन पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवार पेठ डाकवे गल्लीतील काशिद हॉल येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब लबेकर पाटील होते.

बैठकीत मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आरक्षण अंमलबजावणीस विलंब करण्याऱ्या राज्य सरकारवर कार्यकर्त्यांनी टीका केली. शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजीराव जगदाळे यांनी आरक्षण मागणीसाठी युवकांनी आत्महत्या करुन जीवन संपवू नका असे आवाहन केले. ते म्हणाले, 'आरक्षण देण्याबाबत सरकारची मानसिकता दिसून येत नाही हे गेल्या चार वर्षांत दिसले आहे. मुंबईचा मोर्चा शांततेत काढावा. कोणतेही गालबोट लावू नये.'

'मराठा आरक्षण आंदोलनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील फूट पाडत आहेत,' असा आरोप अशोक पोवार यांनी केला. पोवार म्हणाले, 'सरकारने किती फूट पाडण्याच्या प्रयत्न केला तरी मराठा समाज एकी करुन राज्य सरकारवर दबाव आणून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास भाग पाडेल.' जयकुमार शिंदे यांनी मुंबईतील आंदोलनातून सरकारला सळो की पळो करुन सोडले जाईल, असा इशारा दिला. आरक्षण मागणीसाठी आत्महत्या केलेल्या ३३ जणांच्या कुटुंबाना मराठा उद्योजकांनी दत्तक घ्यावे, असे आवाहन मनोज शिंदे यांनी केले. मोर्चासाठी तीन ते चार जणांची समिती नियुक्त करुन नियोजन करावे, अशी सूचना उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी केले. माणिक मंडलिक, राजू भोसले, किशोर डवंग, दीपक गौड, महादेवराव जाधव, किसन कल्याणकर यांची भाषणे झाली. यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, अशोक पाटील, गजानन यादव, किसनराव काशीद आदी कार्यकर्ते उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/85UpFwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬