[kolhapur] - राज्यात सातशे किमीचे रस्ते तातडीने करणार
जिल्ह्यातील ११८ किलोमीटरचा समावेश
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सन २०१९-२० च्या आराखड्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता दिली. जिल्ह्यातील एकूण ११८ किलोमीटर लांबीच्या ७२ कामांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, विविध योजनांतून राज्यातील सातशे किलोमीटरचे रस्ते तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. हे रस्ते दर्जेदार करण्याबरोबरच ते वेळेत पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील हे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये आमदार अमल महाडिक व आमदार सुरेश मिणचेकर हे सदस्य आहेत. सोमवारी या समितीची बैठक झाली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा, रस्त्यांची बळकटी करणे हा मुख्य उद्देश आहे. जिल्हा परिषदेकडील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करणे व त्याचा दर्जा सुधारणे हा मुख्य हेतू ठेवून त्याचे कामकाज सुरू झाले आणि ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत चांगल्या दर्जाचे बांधण्यास प्रथमच सुरुवात झाली. जिल्हा मार्गाचा दर्जा सुधारणे व डांबरीकरण यातून केले जाते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाते. या योजनेतून २०१५ व १६ मध्ये ३८ किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून त्यातील तीन कामे पूर्ण झाली आहेत, तर एक काम अंतिम टप्प्यात आहे. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेली १६ पैकी दहा कामे पूर्ण झाली असून यावर्षी ११८ किमीचे रस्ते तातडीने करण्यात येणार आहेत. यातील ६० किमी लांबीच्या कामांची निविदा काढण्यात आली असून उर्वरित ५८ किमी रस्त्याचा प्रस्ताव तयार आहे. ग्रामसडक योजनेतून ४९१ किमी रस्ते तयार करण्याचे नियोजन आहे, यासाठी २२३ कोटी निधी अपेक्षित आहे. हा निधी जिल्हा नियोजन समिती व राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त संशोधन व विकास कार्यक्रमातून २०७ किलोमीटर रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. हे सर्व रस्ते तातडीने करण्यात येणार असून ते दर्जेदार व्हावेत यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yN8zMAAA