[kolhapur] - लाच मागणाऱ्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल, एकास अटक

  |   Kolhapurnews

(दोन फोटो आहेत)

लाच मागणाऱ्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

नळपाणी पुरवठा बिलांच्या मंजुरीसाठी मागितली साडेतीन लाखांची लाच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या बिलाचे मूल्यांकन आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी साडेतीन लाखांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने शिरोळ पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता आणि पुणे येथील उपअभियंत्यास एसीबीने अटक केली. उपअभियंता अशोक महादेव कांबळे (वय ४५) आणि शाखा अभियंता तुकाराम शंकर मंगल (वय ४२, रा. संभाजीनगर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. कांबळे याची पुण्याला बदली झाली होती. एसीबीने सोमवारी (ता. २७) ही कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गिरिश गोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम ठेकेदाराने टाकवडे येथील राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचा ३ कोटी ८० लाख रुपये कामाचा ठेका २०१४ मध्ये घेतला होता. कामानुसार ठेकादाराला ३ कोटी ५५ लाख रुपये बिल मिळाले. २२ मार्च २०१८ मध्ये पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. त्यानंतर उर्वरित २५ लाख रुपयांचे बिल मिळवण्यासाठी ठेकेदारांनी शिरोळ येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता तुकाराम मंगल यांच्याकडे अर्ज केला. कामाचे मूल्यांकन व ना हरकत प्रमाणपत्र घेऊन टाकवडे ग्रामपंचायतकडे देणे आवश्यक होते. त्यासाठी ठेकेदाराने वारंवार मंगल यांची भेट घेऊन मूल्यांकन व ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/8p91qAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬