[kolhapur] - संरक्षक भिंतीवर होणार ‘स्वच्छ कोल्हापूर’ चे दर्शन
अल्पसंख्याक विद्यार्थी वसतिगृहासाठी निधी देण्याची पालकमंत्र्याची ग्वाही
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'शिवाजी विद्यापीठातर्फे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या शंभर विद्यार्थी क्षमतेच्या वसतीगृहासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या कामाला गती लाभावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत विशेष बैठक घेऊ', अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच विद्यापीठ परिसराभोवती उभारलेल्या संरक्षक भिंतीवर 'स्वच्छ व सुंदर कोल्हापूर'चे चित्रमय दर्शन घडवून कोल्हापूरच्या सुशोभिकरणात भर घालावी, अशी सूचना त्यांनी केली. प्रशासनाने त्याला होकार दर्शविला.
'स्वच्छ व सुंदर कोल्हापूर'चे चित्रमय दर्शन घडविण्यासाठी कलानिकेतन कॉलेजचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील निधी व इतर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विद्यापीठात सोमवारी बैठक झाली. या बैठकीत कुलगुरू देवानंद शिंदे यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्य सरकारकडून घोषित निधी लवकर विद्यापीठाला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्ती केली....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/MiUhQwAA