[maharashtra] - कोकण: म्हाडाने रचला नवा इतिहास; पहिल्याच दिवशी विजेत्यांना देकारपत्र

  |   Maharashtranews

मुंबई: कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीनंतर पहिल्याच दिवशी विजेत्यांना देकारपत्र देत म्हाडाने नवा इतिहास रचलाय. ९ हजार १८ घरासाठी शनिवारी सोडत काढण्यात आली. विजेत्यांची पात्रता तपासण्यासाठी होणारी सगळी दिरंगाई टाळत म्हाडाच्या वतीने लगेचच २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत पात्रता तपासणी विशेष शिबीर म्हाडा मुख्यालयात सुरु करण्यात आलंय.

दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सोडत निघणारअसल्याची घोषणाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शनिवारी केली. 900 ते 1000 घरांसाठी ही सोडत निघणार आहे.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 9,018 घरांच्या लॉटरीची सोडत शनिवारी जाहीर करण्यात आली. यावेळी म्हाडाच्या कोकण विभागाच्या घरांसाठी खरेदीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याविषयी मी स्वतः माहिती घेणार असल्याचे प्रकाश मेहतांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/MqloNwAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬